मुंबई २२ सप्टेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चिऊ ताई चिऊ ताई दार उघड हा टास्क सुरू झाला. ज्यामध्ये पुरुष मंडळी महिला सदस्यांना विनवणी करताना दिसून आले. यातून दोन नावं समोर आली विकास आणि उत्कर्ष. या दोघांमध्ये लढत झाली आणि पहिल्या साप्ताहीक कार्याचा विजेता ठरला उत्कर्ष. मीराचा घरातील सदस्यांबरोबर वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन वाद झाला. तिचा राग सगळ्याच घरच्यांनी अनुभवला. आज शिवलीला घरामध्ये थोडीशी भाऊक होताना दिसणार आहे. तिचे म्हणणे पडले, “आईला बघताना कसे वाटत असेल, कसं वागावं कळतं नाहीये”. त्यावर मीनलने तिला समजावले “तू खूप छान वागते आहेस. चांगलं खेळते आहेस. तुझी मत क्लिअर आहेत. तुला कधीही काही वाटलं तर मी आहे तुझ्यासोबत. विशाल निकम देखील म्हणाला “माऊली तुम्ही खूप खंबीर आहात”.
बघूया आज साप्ताहिक कार्यात कोण बाजी मारत ? कोणाच्या हाती हार येते ? घरामध्ये वेगवेगळे ग्रुप्स होताना देखील दिसत आहेत. नक्की कोण कोणासोबत आहे ?कोणाची साथ कोणाला मिळणार ? हे कळेलच ... बघत रहा तुमचा लाडका कार्यक्रम बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
Bigg Boss Marathi S3 - Day 3 Images
Post Your Comments