बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 44! दादूसना येते आहे या सदस्याची आठवण!

मुंबई १८ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एखाद्या सदस्याशी आपली मैत्री होते, आपण त्या सदस्यासोबत अनेक गोष्टी देखील शेअर करतो. एका ग्रुपमध्ये असो वा वैयक्तिक गेम खेळत असो या घरामध्ये सदस्यांच्या मैत्री होतात आणि त्या बर्‍याचदा घराबाहेर देखील तश्याच राहतात. अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये घरामध्ये बनला होता C ग्रुप... C म्हणजेच क्लिअर.. ज्यामध्ये  तृप्तीताई, स्नेहा वाघ, सुरेखाताई आणि दादूस देखील होते. आणि तेव्हापासून या यांची मैत्री आपण बघत आलो आहोत. कितीही मतभेद झाले, राग आला तरीदेखील ती मैत्री तशीच राहिली. आज दादूस यांना घरामध्ये तृप्ती ताईंची आठवण येते आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले, “तृप्ती मॅडमना मिस करतो आहे. आठवण आली मला. सोनाली म्हणाली, आम्ही आताच नावं काढलेलं त्यांचं. स्नेहा म्हणाली, बघत असतील त्या बाहेरून. दादूस यांनी सांगितले, तृप्ती मॅडम मिस यू... सगळेजण आम्ही तुम्हांला मिस करतो आहे. स्नेहाने देखील संदेश दिला, तृप्ती मॅडम मिस यू... खूप खूप प्रेम द्या... दादूस पुढे म्हणाले, नक्की बघा आम्हांला खूप खूप प्रेम द्या तिकडून...”

अजून घरामध्ये काय काय घडलं जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Bigg Boss Marathi S3

Post Your Comments