छोट्या पुढारीची अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट; म्हणतोय,”मला जाऊ द्याना…”
*बिग बॉस मराठी दिवस सत्ताविसावा*
*‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर*
*Bigg Boss Marathi New Season Day 27* : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील रंगतदार गोष्टी प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहेत. घरातील सदस्य टास्कदरम्यान भांडणं करत असले तरी एकमेकांसोबत मजा-मस्ती करायला त्यांना आवडते. तसेच त्यांची मजा-मस्ती पाहणं प्रेक्षकांच्यादेखील पसंतीस उतरत असतं. अशाप्रकारे आजच्या भागात छोटा पुढारी अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट करताना दिसणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या नवा प्रोमो खूपच गंमतीशीर आहे. या प्रोमोमध्ये छोटा पुढारी अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट करत म्हणतोय,"अंघोळीला लवकर जा म्हणतोय तरी जात नाहीस". छोटा पुढारीला उत्तर देत अरबाज म्हणतो,"नाही जाणार मी अंघोळीला... माझी अंघोळ झाल्यानंतरच तू जायचं अंघोळीला". त्यावर घन:श्याम म्हणतोय,"स्वत:ही जात नाहीस आणि मलादेखील जाऊ देत नाही". पुढे अरबाज आणि छोटा पुढारीच्यामध्ये पडत सूरज म्हणतो,"तुमच्या नादात खूप वेळ वाया जातोय". त्यानंतर अरबाज अंघोळीला जातो. दरम्यान छोटा पुढारी म्हणतो,"माझा भाऊ करुदेतना आम्हाला अंघोळ". पुढे अरबाज त्याला प्रश्न विचारतो,"आता कसं वाटतंय".
अरबाज आणि घन:श्याम अनेकदा एकमेकांसोबत धमाल करताना दिसून येतात. त्यांची ही धमाल प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरते. आजच्या भागातही प्रेक्षकांना त्यांचा हा गंमतीशीर अंदाज पाहायला मिळणार आहे.
#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
-------------------
*बिग बॉस मराठी दिवस सत्ताविसावा*
*निक्की आणि अरबाज ऐकतील का वर्षाताईंचं?*
*'BIGG BOSS मराठी', रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर*
*Bigg Boss Marathi New Season Day 27* : 'बिग बॉस मराठी'च्या घरात काही दिवसांपासून निक्की आणि अरबाजमध्ये अभिजीतमुळे खटके उडताना दिसत आहेत. त्यांच्यात एक दुरावा आला असून आजच्या भागात वर्षा ताई निक्की आणि अरबाजला समजावताना दिसणार आहेत. वर्षा ताईंमुळे निक्की आणि अरबाज यांच्यातील दुरावा कमी होणार आहे.
वर्षा ताई म्हणत आहेत,"मी मोठी आहे असं म्हणता मग इथे तरी माझं ऐका". पुढे निक्की म्हणते,"मी अरबाजला विचारलं की तुला बरं वाटतंय का आता". त्यावर वर्षा ताईंसमोर अरबाज म्हणतो,"ठिके". वर्षा ताई म्हणतात,"त्याला खूप छान वाटतंय..त्याची गळाभेट घे". निक्की आणि अरबाजचा अबोला मिटल्याने घरातील सर्व सदस्यदेखील आनंदी होतात.
#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
Post Your Comments