निक्की अन् अरबाजमध्ये अभिजीतमुळे दुरावा येणार? पाहा प्रोमो
बिग बॉस मराठी दिवस सत्ताविसावा
*‘BIGG BOSS मराठी, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर*
*Bigg Boss Marathi New Season Day 27* : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनला आता चार आठवडे पूर्ण होत आहेत. गेल्या चार आठवड्यात सदस्यांना 'बिग बॉस मराठी'चा खेळ खऱ्या अर्थाने कळला आहे. आता घरातील सदस्यांची समीकरणेदेखील बदलत आहेत. त्यामुळे या नव्या सीझनची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. आता अभिजीतमुळे निक्की आणि अरबाज यांच्यात दुरावा येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अरबाजने याबद्दल आक्षेपही नोंदवला आहे. आता 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज निक्कीला म्हणत आहे,"तुम्हाला चांगलं वाटतंय तर तुम्ही एकमेकांसोबत दिवसभर बोला".
निक्की पुढे अभिजीतला म्हणते,"त्याचं म्हणंन हेच आहे की आम्ही सगळे याच्या विरोधात आहोत. तर तू का नाही आहेस?". तर दुसरीकडे अरबाज अंकिताला म्हणतो,"अभिजीत समोर असेल तर कृपया मध्ये येऊ नकोस. आता मी भिडणार". निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला चांगलीच खटकत असल्याचं पाहायला मिळत आहे.
#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बिग बॉस मराठी दिवस सत्ताविसावा
*इरीनावरून झालाय निक्की आणि वैभव मध्ये कल्ला*
*‘BIGG BOSS मराठी, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर*
*Bigg Boss Marathi New Season Day 27* : 'बिग बॉस मराठी'च्या नॉमिनेशन टास्कमध्ये कालच्या भागात जान्हवीने आर्याला, आर्याने इरिनाला, घनश्यामने अभिजीतला तर अभिजीतने वैभवला नॉमिनेट केलं आहे. त्यामुळे या आठवड्यात आर्या, इरिना, अभिजीत आणि वैभवपैकी कोण घराबाहेर जाणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. आता आजच्या भागात नॉमिनेशनवरुन निक्की आणि इरिना, वैभवमध्ये कल्ला झालेला पाहायला मिळणार आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की इरिनाला म्हणतेय,"बरं झालं नॉमिनेट झाली...आणि आता एलिमिनेट पण झाली पाहिजे". त्यावर वैभव म्हणतो,"निक्की अती होतंय आता". निक्की पुढे म्हणते,"इरिना माझ्या ग्रुपमध्ये आधीपासून नव्हती. नंतर अॅड झाली आहे". निक्कीला थांबवत वैभव म्हणतो,"हे असलं फालतू काही मी ऐकूण घेणार नाही". त्यावर निक्की म्हणते,"मी तुला नाही इरिनाला म्हणाली आहे". वैभव म्हणतो,"बोलूच नको... हातातील बोटं तोंडात घाल". यावर निक्की म्हणते,"मी तुला माझा PA म्हणून घरातून घेऊन आलेली नाही".
निक्की अन् अभिजीतमध्ये रंगली चर्चा!
*‘BIGG BOSS मराठी, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर*
*Bigg Boss Marathi New Season Day 27* : 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अभिजीत आणि निक्की अरबाजच्या वागणुकीवर चर्चा करताना दिसत आहेत. निक्की म्हणते,"अरबाजला वाटतं की आम्ही सगळे याच्याविरोधात आहोत. तर तू का नाहीस. मी अभिजीतसोबत असल्याचं त्याला खटकतं".
#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
Post Your Comments