तो येतोय…आता कल्ला तर होणारच! ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन 28 जुलैपासून दररोज रात्री 9 वा. कलर्स मराठीवर

मराठी मनोरंजनाचा बॉस 'BIGG BOSS मराठी'चं बिगुल वाजलंय आणि आता अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे. 'बिग बॉस मराठी'चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी तयार  आहे.. 100 हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या कलावंतांवर आपली नजर रोखायला सज्ज झालेयत.. 100 दिवसांच्या या प्रवासात अतरंगी नमुन्यांचे बहुरंग, बहुढंग रसिकांना पाहायला मिळणार आहेत. 'बिग बॉस'च्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील दुवा हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख असणार आहे. रितेश देशमुख आपल्या स्टाईलने हा खेळ रंगवणार आहे. या खेळात धमाल आहे, मस्ती आहे, मनोरंजनाचा राडा आहे, धुरळा आहे. फॉरमॅट ओन बाय  बानीजे ग्रुप, बानीजे आणि एंडेमॉलशाइन इंडिया निर्मित, विशेष प्रायोजक SANTOOR, पु.ना. गाडगीळ आणि सन्स यांच्या सहयोगाने 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन येत्या रविवारपासून दररोज रात्री 9 वा. पाहा आपल्या 'कलर्स मराठी'वर. 'बिग बॉस मराठी'च्या या चक्रव्यूहात विविध क्षेत्रातील कमाल अतरंगी स्पर्धक सहभागी होणार आहेत. आता हे अतरंगी स्पर्धक कोण? यंदाच्या सिझनची थीम काय असेल? अशा अनेक रहस्यांचा उलगडा 'बिग बॉस'प्रेमींना आता लवकरच होणार आहे.'बिग बॉस मराठी'च्या आतापर्यंत आलेल्या सर्व प्रोमोमध्ये रितेश देशमुखची 'लयभारी' स्टाईल पाहायला मिळाली. पण आता मात्र नवं पर्व सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आता पाहू या रितेश भाऊ या सगळ्या पाहुण्यांचं कसं स्वागत करणार?? यावेळेस JioCinema वर प्रेक्षकांना त्यांचे आवडते सेगमेंट चुगली बूथ, हाइप फीडमध्ये सहभागी होता येईल. Hype Feed द्वारे चॅटिंग, रिएक्टिंग, पोल्समध्ये सहभागी होता येईल. तसेच एलिमिनेशन व्होटिंगद्वारे मतदान करुन त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला वाचवता येईल.   रितेश भाऊ या सिझनमध्ये कुणाचा मित्र होणार की कुणाचा गुरू होणार?  कुणाबरोबर ग्रॅन्ड मस्ती करणार नि कुणाबरोबर लय भारी दोस्ती करणार? कुणाचं काही चुकलं तर भाऊ कानही उपटणार आणि कधी कुणाची पाठही थोपटणार आहे! रितेश भाऊचा हा अनोखा अंदाज पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आता उत्सुक आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाबद्दल रितेश देशमुख म्हणाला', "बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची खूप उत्सुकता आहे. अनेक वर्षांपासून मी हा शो फॉलो करतोय. आता 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा होस्ट म्हणून 'कलर्स मराठी'सोबत जोडला गेल्याचा आनंद आहे. 'बिग बॉस मराठी'ला नव्या ढंगात, नव्या रुपात पोहोचवण्याची आमची जबाबदारी आहे. नव्या सीझनमध्ये राडा, धुरळा, मजा-मस्ती आणि लय भारी कल्ला होणार.".   'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाबद्दल कलर्स मराठीचे प्रोग्रेमिंग हेड केदार शिंदे म्हणतात,"कलर्स मराठीचा सगळ्यात बिग तिकिट शो “बिग बॉस मराठी" दोन वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या शोसोबत कलर्स मराठीच्या प्रवासाचा नवा अध्याय सुरू होतोय, ज्यात कल्पकतेची उंच भरारी असेल. बॉलीवूडचा स्टायलिश स्टार आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार रितेश देशमुख वर या शो चा होस्ट म्हणून आम्ही जबाबदारी सोपवली आहे. 'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सिझन हटके असणार आहे .. तो अधिक टवटवीत आणि तरूण असणार आहे.'बिग बॉस'च्या घरात जायला खूप हुशारी आणि हिंमत लागते. या सिझनमध्येही असेच जिगरबाज, हरहुन्नरी कलावंत आम्ही महाराष्ट्राच्या विभिन्न भागातून निवडले आहेत.. जे या सिझनला एका वेगळ्या उंचीवर नेतील, याची मला खात्री आहे".   आता लवकरच 'बिग बॉस'च्या आलिशान घराचे दरवाजे उघडले जातील..आता कळणार आहे,  बिग बॅासच्या या घरात प्रवेश करण्याचं भाग्य कुणाला मिळणार ?? कोणाची स्वप्नं सत्यात उतरणार नि कोण स्वप्नांचे सौदागर होणार!! आपली मनं पुन्हा एकदा जिंकायला, आपल्याला नवा अनुभव मिळवून द्यायला हे नवं घर आणि नवे सदस्य सुसज्ज आहेत 28 जुलैपासून दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही JioCinema वर. 'बिग बॉस'ची करडी नजर तुमच्यावर देखील आहे.. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.colorsmarathi.com  ... तुम्हाला आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजवर देखील याचे अपडेट्स मिळू शकतात @Colorsmarathi and @BiggBossMarathi त्यासाठी हॅशटॅग #BiggBossMarathi | इंस्टाग्राम आणि ट्विटर युसर्सना एक्सक्लूसिव्ह माहिती मिळू शकते. @Colorsmarathiofficial आणि @ColorsMarathi यावर...

Post Your Comments

Recommended