शिवलीला बाळासाहेब पाटील वैद्यकीय कारणास्तव काही काळ बिग बॉस मराठीच्या घराबाहेर !

शिवलीला बाळासाहेब पाटील वैद्यकीय कारणास्तव काही काळ बिग बॉस मराठीच्या घराबाहेर !

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या बिग बॉस मराठी कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राभर रंगते आहे. कार्यक्रमाच्या या पर्वातील सदस्यांना देखील प्रेक्षकांचे भभरून प्रेम मिळते आहे. बिग बॉस हा कार्यक्रम आणि अनिश्चितता यांच खूप जवळच नातं आहे. या खेळात कधी काय घडेल ? हे कोणच सांगू शकत नाही. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये दोन सदस्यांची नावं गाजली आणि ती म्हणजे तृप्ती देसाई आणि शिवलीला बाळासाहेब पाटील. अत्यंत वेगळ्या क्षेत्रातून आलेल्या या दोन्ही महिलांनी पहिल्याचं दिवसापासून प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित केले. नुकतच शिवलीला यांनी कार्यक्रमामध्ये सांगितले “इथला प्रत्येक माणूस माझा असेल”. त्यांच्या या वाक्याने सदस्यांबरोबरचं प्रेक्षकांची मने देखील जिंकली. पण, शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली. आणि आज बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावं लागलं. त्यामुळे आजपासून व्होटिंग लाईन्स बंद राहतील.

Post Your Comments