मुंबई ८ डिसेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घराच्या सुरू असलेल्या साप्ताहिक कार्यामध्ये सदस्यांच्या संयमची कसोटी लागणार आहे. ज्या सदस्याच्या विरोधात खेळले त्याचे पाय देखील धरण्याची वेळ येणार आहे. कारण घरात आलेले नवे सदस्य आता फक्त सदस्य नसून लिलिपुट नगराचे हुकूमशहा आहेत आणि बाकीचे ८ सदस्य जनता. त्यामुळे हुकूमशहाच्या आदेशाचे पालन करणे प्रजेस बंधनकारक असणार आहे. याचमुळे कदाचित जयला आदिशच्या पायाजवळ बसावे लागले आहे तितकेच नसून त्याची स्तुति देखील करताना जय दिसणार आहे. आता हा टास्कचा एक बहग आहे की तो खरंच करत आहे हे आजच्या भागामध्ये कळेलच.
जय म्हणताना दिसणार आहे, सर्वगुण संपन्न खेळाडू होते आणि अजूनही आहेत. आणि ते deserve करत होतो म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. ते अतिशय उत्तमरीत्या पार पाडतात प्रत्येक कार्य मी बघत आलो आहे. मग ते भोपळयाचे कार्य असो... त्यांच्याबरोबर खेळताना एक वेगळीच ऊर्जा असायची, मज्जा आली खेळताना. बारा आठवडे झाले पण ज्यावेळेस आदिश घरामध्ये होते तो क्षण मी कधीच विसरू शकतं नाही. कारण, आदिश याने संपूर्ण घराला हलवून सोडलं होतं... आणि हे कौतुक असेच सुरू राहिले.
बघूया पुढे या टास्कमध्ये अजून काय काय घडले आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
Bigg Boss Marathi S3
Post Your Comments