मुंबई ६ डिसेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल कोणताच सदस्य घराबाहेर पडला नाही. मात्र मीराला फसवलं… ती घराबाहेर जाणार असं वाटतं असतानाच तिला चिठ्ठी मिळाली ज्यात फसवलं असे लिहिले होते. आज घरातील सदस्यांना मोठं सरप्राईझ मिळणार आहे कारणं घरामध्ये एंट्री होणार नव्या सदस्यांची... म्हणजेच स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांची. आता हे तिघे घरात गेल्यानंतर सदस्यांमधील नाती किती बदलणार ? घरातील समीकरण किती बदलणर ? हे हळूहळू कळेलच.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले, घरात येत आहेत नवीन सदस्य... आणि एंट्री झाली स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांची. घरामध्ये एंट्री घेताच स्नेहाने साधला जयवर निशाणा. त्याला सुनावले खडे बोल. स्नेहा म्हणाली, “
या घरात सुरुवातीपासूनच जो कोणी माझ्याशी गेम खेळत होता तो फक्त जय दुधाणे होता. आपलेच मित्र आपल्या मागून आपलीच एवढी इज्जत नाही काढतं....”
बघूया हे तीन नवे सदस्य घरामध्ये गेल्यावर अजून काय काय घडणार आजच्या भागामध्ये. तेव्हा पुढे काय होतं जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
Bigg Boss Marathi S3
Post Your Comments