बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस आहे तिसरा ! “मी टास्क जिंकलो तर माझ्या लोकांना मदत करणार” – उत्कर्ष “अक्षय आणि दादुसला काही करून पटव” – मीनल

मुंबई २२ सप्टेंबर, २०२१ : चिऊ ताई चिऊ ताई दार उघड या टास्कसाठी घरातील सगळेच सदस्य खूप कष्टाने महिला सदस्यांना विनवणी करताना दिसत आहेत. ज्यामध्ये उत्कर्ष तृप्ती देसाई यांना सांगताना दिसला, “जर मी हा गेम जिंकलो तर मी तुमच्या लोकांना मदत करणार जे माझ्या जवळचे आहेत. तुम्हाला माहिती आहे इथे जी मुलं आहेत ते वेगळ्या टीममध्ये आहेत. तुम्हाला माहिती आहे जर मी जिंकलो तर पुढच्या टास्कला मी तुमच्या लोकांना म्हणजेच तुम्ही, शिवलीला तुम्हाला माहिती आहे कोण कोण त्यांना मी साथ देईन… तुम्ही तुमचा पण विचार केला पाहिजे जर टिकायचे आहे तर, विचार करा”. उत्कर्षने गायत्रीला बोलताना सांगितले “आपल्या टीममधून माझ्याकडे एक पॉइंट आलेला आहे आणि जर मला अजून एक पॉइंट मिळाला तर मी आपल्या टीमला स्ट्रॉंग करू शकतो”. तुम्ही दोघीच आहात... गायत्रीचं म्हणणं पडलं या राऊंडला तुझं नावं कोणीचं घेणार नाही पण पुढच्या राऊंडला नक्कीच आहे. नक्की कोण या रेसमध्ये टिकून रहाणार ? कोण कोणाला टिकवून ठेवणार ? कोण बाजी पलटणार ? हे कळणार आजच्या भागामध्ये. कारण प्रत्येक सदस्य त्याच्या ग्रुपमधल्या सदस्याला वा स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात आहे.
दुसरीकडे, मीनल विशाल, विकास, सोनाली यांना समजविण्याचा प्रयत्न करते आहे नक्की काय गेम झाला, “ बझर झाल्यानंतर जय आणि विकास आला त्यांनी मुद्दा सांगितला आणि निघाले कारण दुसर्‍याला चान्स मिळायला पाहिजे.पण जेव्हा आविष्कार आणि उत्कर्ष आले त्यांनी खूप वेळ घेतला. मीनल विशाल सांगणार आहे तू दादुस आणि अक्षयला सांग तुम्ही बाहेर येऊच नका जोवर बझर होत नाही. जर अक्षय आणि दादुस अडून राहिले आम्ही बाहेरच नाही येणार तर खरी गंमत येईल”.
पुढे टास्कमध्ये काय होणार जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन ३ दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Post Your Comments