मुंबई २४ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस यांनी एखादा टास्क सदस्यांवर सोपावला की त्यांच्यात डील होणे हे आलेच. आज असंच काहीसं दादूस आणि विकासमध्ये होणार आहे. विशाल, विकास दादूस यांना एक मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. दादूस विकासच्या म्हण्यात येतील ? हे आज कळेलच.
विकास दादूसना म्हणाला, होऊ शकतं दादूस... दादूसचे म्हणणे आहे तुमचं इतकं प्रेम असल्यावर काय सवालच नाही... विशाल दादूसना सांगताना दिसणार आहे, प्रेम वैगरे काही नसतं आहो... इथे प्रेम काही चालत नाही. इथल्या इथे प्रेम नाहीये... प्रेम बाहेरच्या लोकांचे आहे. इथे कोणी कोणावर प्रेम नाही करत. तुम्हांला दिसेल ते या आठवड्यात. जे तुम्हांला तुमचे वाटतात ना ते पण... विकास मात्र एकच गोष्ट धरून बसला आहे आणि म्हणतो आहे...तुमचे पैसे आहेत ना दादूस सगळे, तुम्ही कॅप्टन बनाल. का सांगा, तुमचे दोन उमेदवार आले की तुमचं वोटिंग कमी झालं आमचं वोटिंग वाढल. आमच्याकडे चार वोटिंग तुमच्याकडे तीन. तुम्ही जर बोला आम्ही तुम्हांला चारही मतं देतो. Deciding वोट आमचं रहाणार... गेम पलटी होऊ शकतो. या गोष्टीवर विचार करा... दादूस म्हणाले, एका माणसावर सगळं होईल ना?
बघूया काय होतं ते आज. बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
Bigg Boss Marathi S3
Post Your Comments