मुंबई १९ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडलेल्या “हो पाइपलाईन तुटायची नाय” या साप्ताहिक कार्यामध्ये स्नेहा कॅप्टन्सीच्या कार्यासाठीची पहिली उमेदवार ठरली. अजून कोणता सदस्य उमेदवार असेल ? टास्क करा पार पडला जाईल ? हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल नक्की कोणते सदस्य शिक्षेस पात्र आहेत.
बिग बॉस यांनी जाहीर केले, घरातील काही सदस्य कार्य अनिर्णित कसे ठेवले जाईल या प्रयत्नात दिसले. परिणामी दोषी सदस्यांचे वास्तव्य जेलमध्ये असेल. कोणी आणले कार्यामध्ये विघ्न ? कोणात्या सदस्यांना मिळणार कारागृहाची शिक्षा ?
जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
Bigg Boss Marathi S3
Post Your Comments