बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 45! बिग बॉसने दिली गायत्रीला एक विशेष सूचना !

मुंबई १९ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टास्कमध्ये सदस्य भान हरपून खेळतात. त्यामध्ये आपल्याला किंवा आपल्यामुळे दुसर्‍याला दुखापत तर होत नाहीना याची काळजी घ्यायचा त्यांना विसर पडतो. तरी टास्क दरम्यान बिग बॉस वारंवार सूचना देत असतात एकेमकांना इजा होईल असे काही करू नका... आज बिग बॉस गायत्रीला एक विशेष सूचना देणार आहेत.

बिग बॉस यांनी गायत्रीला सांगितले, आजचे कार्य पार पाडताना आपल्याला दुखापत झाली. तसेच पुढील किमान तीन आठवडे आपल्याला स्लिंग घालायचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. याचसोबत टास्क खेळण्यासाठी देखील मनाई केली आहे. आता आपल्याला त्वरित आराम मिळणे जास्त आवश्यक आहे. असे बिग बॉस यांनी गायत्रीला सांगितले. बघूया पुढे काय होते.

बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोक रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Bigg Boss Marathi S3

Post Your Comments