नवं घर नवीन सदस्यांनी सजणार महाराष्ट्रात एंटरटेनमेंट अनलॉक होणार !
बिग बॉस मराठी सिझन तिसरा १९ सप्टेंबर संध्या. ७ वा. आणि दररोज रात्री ९.३० वा.
Brooke Bond Red Label प्रस्तुतकर्ते म्हणून सहभाग आणि विशेष प्रायोजक म्हणून TRESemme, A23 आणि HAIER चा सहभाग
मुंबई १५ सटेंबर, २०२१ : “बिग बॉस सांगू इच्छितात, बिग बॉस आदेश देत आहेत” हे वाक्य आणि हा दमदार आवाज महाराष्ट्राच्या घरारात घुमला. असं घर ज्याने आपल्या सगळ्यांची मनं जिंकली. एक असा कार्यक्रम ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला आपलसं केलं. ज्या कार्यक्रमाची उत्सुकता महाराष्ट्राला गेल्या दोन वर्षांपासून होती. ज्या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वांनी आपल्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ज्या घराने सदस्यांची अनेक रूपं पाहिली, आव्हानांसाठी सदस्यांमध्ये रंगलेली चुरस पाहिली. सदस्यांच्या प्रत्येक कृतीचे जे घर साक्षीदार राहिलं. ज्या घराने सदस्यांचे मुखवटे काही दिवसांतच उतरवले आणि त्यांचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आणला, असं घर जे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं. ते घर आता परत येत आहे खर्या अर्थाने एंटरटेनमेंट अनलॉक करायला. कलर्स मराठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात भव्य रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन 3. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून आपण एक प्रकारची मरगळ, उदासिनता अनुभवत आहोत. पण आता खर्या अर्थाने मनोरंजनाचा तडका लागणार. जेव्हा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये साठहून अधिक कॅमेरांच्या नजरकैदेत १५ सदस्य असणार. घरातील सदस्य आणि बाहेरील जग यामधील दुवा म्हणजे कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. मागील दोन्ही पर्वांमध्ये आपल्या सूत्रसंचालनाच्या अनोख्या पध्दतीमुळे आणि दमदार व्यक्तिमत्वामुळे प्रेक्षकांची मने जिंकणारे आणि मराठी माणसाला नेहेमीच आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर याही पर्वात सुत्रसंचालकाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणार आहेत.
बिग बॉस मराठी सिझन 3 साठी Brooke Bond Red Label प्रस्तुतकर्ते म्हणून सहभाग आणि विशेष प्रायोजक म्हणून TRESemme A23 आणि HAIER यांचादेखील सहभाग. एंडेमॉल शाइन इंडिया निर्मित Broke Bond Red Label प्रस्तुत बिग बॉस मराठी सिझन 3 एका दिमाखदार सोहळ्याद्वारे १९ सप्टेंबर रोजी संध्या. ७.०० वा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यानंतरचे भाग सोम ते रवि रात्री ९.३०वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर प्रक्षेपित होतील. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांची धम्माल मस्ती, एकमेकांबद्दल करत असलेले गॉसिप याबद्दल तरूणपिढी मध्ये खूपच उत्सुकता असते यावेळेस पहिल्यांदा हे २४ तास VOOT वर बघायला मिळणार आहे. तसेच प्रेक्षक त्यांचे प्रश्न सदस्यांना “तुमचे प्रश्न” आणि संदेश चुगली बूथद्वारे पाठवू शकणार आहेत. कार्यक्रमाचे मूळ भाग प्रेक्षक कधीही VOOT बघू शकतात.
प्रमुख, प्रादेशिक मनोरंजन (मराठी आणि कन्नडा) वायकॉम18 रवीश कुमार म्हणाले, “बिग बॉस या कार्यक्रमाने इतक्या वर्षांमध्ये स्वत:चा विश्वासू, हक्काचा असा प्रेक्षकवर्ग मिळवला आहे मग तो मराठी असो हिंदी असो व इतर भाषांमध्ये असो. कलर्स मराठी गेल्या दोन वर्षापासून नाविन्यपूर्ण कथा प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहे आणि ज्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. बिग बॉस कार्यक्रम डिजिटल माध्यमामध्ये देखील अधिक लोकप्रिय असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यास सक्षम आहे. बिग बॉस मराठीच्या मागील दोन सिझनप्रमाणे या वर्षीदेखील वाहिनीसोबतच, डिजिटल माध्यमामधील मराठी प्रेक्षकवर्गामध्ये वाढ होईल हे निश्चित. या कार्यक्रमामधील स्पर्धकांमधील चुरस, त्यांच्या भाव – भावना आणि कार्यक्रमाची भव्यता प्रेक्षकांना नक्कीच बघायला आवडते. सध्यस्थिती बघता सगळ्याच वाहिनींची स्ट्रॅटेजि आणि गणित पूर्णपणे बदली आहेत. सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमानंतर आता आशा आहे बिग बॉस मराठीचा सिझन 3 ला देखील मागील दोन सिझन प्रमाणेच प्रेक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल.
व्यवसाय प्रमुख- कलर्स मराठी, (वायकॉम18) अनिकेत जोशी म्हणाले,“मागील एका वर्षांपासून कलर्स मराठी बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व आणण्याचा विचार करत होती. पण आपण सगळेच एका अत्यंत कठीण परस्थितीचा सामना करतोय. आता कुठे परिस्थिति सुधारते आहे. लोक हळूहळू त्यातून बाहेर पडत आहेत. प्रेक्षकांना मनोरंजनासाठी अनेक व्यासपीठ उपलब्ध आहेत. यामुळेच आमची जबाबदारी अधिक वाढते. मराठी प्रेक्षक अतिशय चोखंदळ असून आता त्याची आवड देखील बदलत आहे. हेच लक्षात घेता कलर्स मराठीने या काळात काही वेगळे, दर्जेदार आणि आशयघन विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला.
पुढे ते म्हणाले, “बिग बॉस मराठीबद्दल सांगायचं झालं तर या कार्यक्रमाला स्वत:ची अशी ओळख आहे. कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वांना भरघोस यश मिळाले. संपूर्ण महाराष्ट्रासोबत आम्हांला देखील तिसर्या पर्वाची उत्सुकता होती. बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व आणण्याचा जेव्हा आमचा निर्णय झाला तेव्हा एकच गोष्ट मनात होती ती म्हणजे हे पर्व अधिक रंजक कसं करता येईल. याकरीता आम्ही कार्यक्रमामध्ये काही बदल केले आहेत जे कार्यक्रम सुरू झाल्यावर कळतीलच. प्रेक्षकांना यावेळेस घरात काय सुरू आहे हे ते VOOT द्वारे २४ तास बघायला मिळणार आहे. महाराष्ट्राला यावेळेस बिग बॉस मराठीचा मराठमोळा अंदाज बघायला मिळणार आहे नक्की ! आम्ही आशा करतो हे पर्व देखील खर्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रात एंटरटेनमेंट अनलॉक करेल”.
प्रोग्रामिंग हेड कलर्स मराठी (वायकॉम18), विराज राजे म्हणाले, “गेली दोन वर्ष आपण पँडेमिक आणि लॉकडाउन या परिस्थितीमधून जात आहोत. त्यामध्ये सगळीकडेच आपण बघतो आहे माणसं मानसिकरीत्या दुर्बळ झालेली आहेत आणि अशावेळी आम्ही असा शो घेऊन येत आहोत ज्यामध्ये १५ सदस्य जे घरामध्ये जाणार आहेत ते मानसिकरीत्या खंबीर हवेत. कारण, या खेळात मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक खंबीरता याची कसोटी लागते. आपण Unlock Entertainment म्हणतो आहे खर ! पण हे १५ सदस्य स्वत:ला १०० दिवसाठी लॉकडाऊन करून घेणार आहेत आणि एक इंटरेस्टिंग खेळ घरात रंगणार आहे. त्यामध्ये प्रत्येकाच मानसिक स्वास्थ्य समजून येईल. जो वाईट काळ आपण अनुभवला आहे, त्यातून उभारी देणारं, खंबीर राहून कसं आपण सकारात्मकरीत्या आयुष्य जगावं हा संदेश देण्याचा आमचा मानस आहे.
पुढे ते म्हणाले, “बिग बॉस मराठी सिझन३ आणि घराबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही “मराठीपण” आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. सेट डिझाईनपासून, टास्क, वेगवेगळया राऊंड मध्ये त्याची झलक दिसणार आहे. Weekend चा डाव याला आपण चावडीचं स्वरूप देणार आहोत. हे मराठीपण जपण्याच्या आमच्या हेतुमधलं सगळ्यात महत्वाचं पाऊल असणार आहे. अशाप्रकारे सिझन ३ मध्ये वेगळेपण साधण्याचा आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे”.”.
घर म्हणजे चार भिंती नसून प्रत्येकालाच आपलीशी वाटणारी हक्काची जागा. प्रत्येक घराला घरपण हे त्यात रहाणाऱ्या माणसांमुळे येत असतं. असंच एक घर जे मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आणि प्रत्येकाच्या मनात घर करून गेलं ते म्हणजे बिग बॉस मराठीचं घर. या घरामध्ये यावर्षी कोणते सदस्य जाणार याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे, पण त्याहून जास्त उत्सुकता आहे यावर्षीचं घर कसे असेल हे जाणून घेण्याची ? काय विशेष असेल ? काय बदल करण्यात आले असतील? यावर्षी १४,००० चौरस फूट अश्या भव्य जागेमध्ये विविध क्षेत्रातील १५ लोकप्रिय व्यक्तिमत्व घरामध्ये सदस्य म्हणून जाणार आहेत. घराच्या मध्यभागी मोठे आंगण आणि मोठे ऍक्टिव्हिटी क्षेत्र असणार आहे. याव्यतिरिक्त, एक भव्य सेट तयार करण्यात आला आहे ज्याद्वारे महेश मांजरेकर स्पर्धकांशी संवाद साधतील. घरामध्ये अस्सल मराठमोळ्या आकर्षक अश्या काही गोष्टींचा देखील वापर करण्यात आला आहे ज्यामुळे घराची शोभा अजूनच वाढणार आहे.
बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन तब्बल दोन वर्षांनी येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कार्यकर्मामध्ये कोणते नवे ट्विस्ट असतील, सदस्य कोण असतील याबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. बिग बॉस मराठी तिसऱ्या सिझनचे सूत्रसंचालन देखील महेश मांजरेकर करणार असून याबाबत बोलताना ते म्हणाले, “मागील दोन वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच खूप कठीण होती. प्रत्येकजण या वादळाला मोठ्या धीराने सामोरी गेलं आणि अजूनही जातं आहे. या सगळ्यामध्ये आता एक आनंदाची गोष्ट म्हणजे मी परत येतोय महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम बिग बॉस मराठीचा नवा सिझनं घेऊन. बिग बॉस मराठीच्या येण्याने मी आशा करतो काही क्षणासाठी का होईना प्रेक्षकवर्ग त्यांचं दु:ख विसरेल. एका वर्षानंतर बिग बॉस मराठीचा नवा सिझन येतो आहे उत्सुकता तर नक्कीच आहे. मला खात्री आहे पहिल्या दोन्ही सिझनप्रमाणे हा सिझन देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. मी सहभागी स्पर्धकांना या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो”.
बिग बॉस मराठी सिझन तिसरा याबाबत बोलताना सीईओ, एंडेमॉल शाइन इंडिया अभिषेक रेगे – म्हणाले, “बिग बॉस या कार्यक्रमाने मराठी टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये एक बेंचमार्क तयार केला. आणि हेच लक्षात घेता तिसरा सिझन उत्कृष्ट बनविण्यासाठी एंडेमॉल शाइन इंडियाची टीम अधिक जोमाने तयारी लागली आहे. यावेळेसचे टास्क, अनपेक्षित - नवीन ट्विस्ट, फ्रेश कंटेंट प्रेक्षकांना संपूर्ण सिझन मनोरंजन देतील आणि खिळवून ठेवतील.”
घराचा दरवाजा आता पुन्हा उघडणार, वेगवेगळ्या स्वभावाचे नवे आणि कलंदर कलाकार पुन्हा एकदा एकत्र येणार. बिग बॉस मराठी सिझन ३ सज्ज आहे नवं घर आणि नवे सदस्य घेऊन आपली मनं पुन्हा जिंकायला,आपल्याला नवा अनुभव मिळवून द्यायला. बिग बॉसची करडी नजर तुमच्यावर देखील आहे तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
चुकून राहलंच तर विसीट करा www.colorsmarathi.com ... तुम्हाला आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजवर देखील याचे अपडेट्स मिळू शकतात @Colorsmarathi and @BiggBossMarathi त्यासाठी हॅशटॅग #BiggBossMarathi3 | इंस्टाग्राम आणि ट्विटर युसर्सना एक्सक्लूसिव्ह माहिती मिळू शकते @Colorsmarathiofficial आणि @ColorsMarathi यावर...
[caption id="attachment_3307" align="aligncenter" width="640"] Big Boss Marathi Virtual Press Conference[/caption]
Post Your Comments