बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस पाचवा ! मीराचे वाद काही संपेना… “मला पहिल्या दिवसापासून त्रास देत आहेत” – मीरा

मुंबई २४ सप्टेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये १५ वेगवेगळ्या स्वभावाचे लोकं एकत्र रहाणार म्हणजे वादविवाद होणारच, खटके उडणारच. तसंच काहीसं यावेळेस देखील दिसून येतं आहे. मीरा पहिल्या दिवसापासूनच काहीना काही मुद्द्यांना घेऊन चर्चेत आहे. मग कधी ते स्नेहा वाघ सोबत असो तर कधी जयसोबत असो. आज मीरा आणि आविष्कारमध्ये पडणार आहे वादाची ठिणगी. मीराला आविष्कार सांगायचा प्रयत्न करत आहे, “बाकीच्या सदस्यांनी जसं आवरून ठेवलं आहे तसं तरी किमान ठेवावं”, तसं करण्यास मीराने साफ नकार दिला आणि हे आतापासून नाही पहिल्या दिवसापासून तसंचं आहे असे ती म्हणाली. त्यावरून वाद पुढे वाढला. आविष्कार म्हणाला, “पहिल्या दिवसाच मला सांगू नकोस, प्रत्येक जण स्वत:चं काम करतो आहे बाकी साफ सफाई करणं माझं काम आहे. तुला मुद्दाम टाकायचं असेल तर मी बघतो काय करायचं... मीराचं त्यावर म्हणणार आहे, “मी तुम्हांला एकच काम सांगते आहे, तुम्हाला करायचे असेल तर करा, नसेल जमणार तर तुम्ही मला नाही म्हणून सांगा. मी तशी तक्रार करेन. मी आता करणारच आहे तक्रार. मीरा पुढे म्हणाली, “पहिल्या दिवसापासून हे मला त्रास देत आहेत. रोज सकाळी हेच. त्यांनी कालपासून ठरवलं आहे की ते मला नडणार आहेत. जरा मी नडायला गेले ना यांना तर मग मी वाट लावेन. मी शांत आहे कारण ते दोन - दोन काम करत आहेत. दुसर्‍या दिवशी सांगितलं होतं पहिले बेडरूम करायची आणि मग किचन. मग का नाही ऐकत , मी नाही ना अडून बसले त्यावर”.

आता मीरा आणि आविष्कार मधला वाद सुरूच राहिला की ती इथेच थांबला. हे कळेल आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Bigg Boss Marathi S3 - Day 5 Images

Post Your Comments