मुंबई २९ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पार पडणार आहे “Knock Out” हे नॉमिनेशन कार्य. Top 8 पर्यंत पोहचल्यावर ही स्पर्धा अधिकच कठीण होत जाणार हे निश्चित...इथवर पोहचल्यानंतर कोणत्याच सदस्याला आता नॉमिनेशनची टांगती तलवार डोक्यावर नको आहे. आणि त्यामुळे आता प्रत्येक सदस्य यातून स्वत:ला कसं वाचवता येईल यावर लक्ष केंद्रीत करताना दिसणार आहेत. आज टास्क दरम्यान विकास, सोनाली आणि मीनल चर्चा करताना दिसणार आहेत.
विकास सोनालीला सांगताना दिसणार आहे, दोन गोष्टी आहेत लक्षात ठेव, तुझ्याकडे उत्कर्ष येणार तो बोलणार तू माझं टाकू नकोस मी तुझं नाही टाकत. तो येणार तुला म्हणणार माझं टाकू नकोस, मीराचं टाकू नकोस मी तुझं टाकतं नाही. तू काय म्हणायचं असं झाल्यावर कोणीच जाणार नाही. मग हक्क कोणाकडे येणार संचालकाकडे. संचालक कोणाचं नावं घेणार सोनालीचं. हे जरा लक्षात घे. आणि मग ठरवं. विशालने आता परत खूप मोठी चूक केली. मीनल त्यावर म्हणाली, त्याने परत तीच चूक केली. जर त्याने कोणा दुसर्यासोबत डील केली असती ना तर गोष्ट वेगळी आहे. जयने म्हणून ही डील केली... पण जर त्याला असं करायचं आहे तर करू दे. विकास म्हणाला, करू दे... आता येणारचं ना कॅप्टन्सी टास्क आणि त्याला टाकू आपल्या टीममध्ये... नक्की जयने आणि विशालने काय डील केली? आणि विशालची डील जयने स्वीकारली ? आणि स्वीकारली तर का ? ही आजच्या भागामध्ये कळेलच.
विकास इथे बोलताना बोलून गेला आपल्या टीममध्ये टाकू दे त्याला. म्हणजे यांचा ग्रुप तुटला म्हणायचं का ? नक्की काय होणार या टास्कमध्ये ? कोण होणार सेफ ? बघूया आजच्या भागामध्ये. बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज आरतरी ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
Bigg Boss Marathi S3
Post Your Comments