बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 51 ! मीरा, जय आणि उत्कर्ष यांची सुरू आहे गंभीर चर्चा… “या शोसाठी काय महत्वाचं आहे…” – जय !

मुंबई २९ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे मीरा, उत्कर्ष आणि जय यांची एका खास विषयावरून  चर्चा... जय आणि उत्कर्ष मीराला सल्ला देणार आहेत याचसोबत जय बिग बॉस मराठी या शो विषयी त्याला काय महत्वाचं वाटतं हे उत्कर्ष आणि मीराला सांगताना दिसणार आहे.

उत्कर्ष मीराला सांगताना दिसणार आहे, मीरा तू स्पर्धक म्हणून स्वत:ला किती बाहेर टाकू शकतेस या गोष्टीमधून हे महत्वाचे आहे... ट्रॉफी तर एकच आहे, ती एकालाच मिळणार आहे. जयचे त्यावर म्हणणे आहे, मी मगाशी तेच म्हंटल की, जिंकण किंवा हरणं या शोला महत्वाचे नसते. या शोसाठी काय महत्वाचं आहे तुम्ही या शोला काय देताय आणि या शोसोबत तुमचं नावं कसं जोडलं जातं. आज बिग बॉस मराठी सिझन 3 जेव्हा नावं घेतलं जातं त्यावेळेला कोणत्या स्पर्धकाचे नावं पहिले येतं, विजेत्याचे नावं पहिले येत नाही. मला असं वाटतं तो जर ऑन झाला ना अजून मजा येते, आपल्याला भिडायला मजा येते ना... नाहीतर विकास येत नाही रे. विकास काहीचं करत नाही. मागच्या आठवड्यात तो नाही आला तर मग कोणीच नाही आले. टास्क जिंकणं किंवा हरणं महत्वाचे नाहीये ना तुमचे एफर्ट्स...

बघूया ही चर्चा अजून किती रंगत गेली... बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज आरतरी ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Bigg Boss Marathi S3

Post Your Comments