बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 48 ! मासळी बाजारात अमूल्य मोतींवरून सदस्यांमध्ये भांडण… विकास आणि गायत्रीमध्ये होणार वादावादी ?

मुंबई २४ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे “म्हावर्याला लागलाय नाद” हे साप्ताहिक कार्य सुरु आहे. आणि याच कार्याच्या शेवटी मिळणार आहेत कॅप्टन्सीचे दोन उमेदवार. उमेदवारी मिळविण्यासाठी सदस्य आतापासूनच जोरदार प्रयत्नात  आहेत असे म्हणायला हरकत नाही. आज खेळात एक ट्विस्ट येणार आहे आणि आज बिग बॉस तो सगळ्या सदस्यांना सांगणार आहेत. आणि त्यावरूनच गायत्री आणि विकासमध्ये वादावादी होण्याची शक्यता आहे.

बिग बॉस यांनी जाहीर केले, समुद्रातून मासे पकडताना जाळ्यात मोतीही सापडले आहेत. या एका अमूल्य मोतीची किंमत आहे ५० मास्यांएवढी...टास्क दरम्यान विकास आणि गायत्रीमध्ये यावरूनच वाद होताना बघायला मिळणार आहे. गायत्रीचे म्हणणे आहे, विकास पाटील तुम्ही वरतून घेतला आहे... मी तो मोती धरणार नाही मोजताना.

बघूया आज टास्कमध्ये काय घडणार. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मारठीवर.

Bigg Boss Marathi S3

Post Your Comments