बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 43 ! कोणी केला विश्वासघात ? TEAM A साठी कोण आहे threat ?

मुंबई १७ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळीच समीकरण बदलताना दिसतं आहेत. नक्की कोण कोणाच्या बाजूने खेळत आहे, कोण कोणाचा दुश्मन आहे ? कोणापासून threat आहे ? हे सांगण जरा अवघड होऊन बसलं आहे. प्रत्येकाला घरामध्ये टिकून राहायचे आहे आणि त्यामुळे प्रत्येक सदस्य त्याचा त्याचा गेम खेळतो आहे असं म्हणायला हरकत नाही. यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून मैत्रीच्या शपथा घेणारे सदस्य कुठवर ही मैत्री जपातील हे येणार्‍या दिवसांमध्ये कळणार आहेच. ग्रुपमध्ये देखील आता फुट पडण्यास सुरुवात झाली आहे. विकास – विशालनंतर आता कुठेतरी मीरा आणि गायत्रीमध्ये देखील दुरावा येत आहे असे दिसते आहे. मग काल मीराने उत्कर्ष, दादूस आणि जयसमोर तिचे मनमोकळे करणे असो वा मग त्यांची आजची चर्चा असो. आता आजची ही चर्चा नक्की गायत्रीवरुनचं आहे की मीरा आणि उत्कर्ष कोणा दूसर्‍या सदस्याबद्दल बोलत आहेत हे आजच्या भागामध्ये कळेलच.

उत्कर्ष आणि मीरा आज चर्चा करताना दिसणार आहेत. उत्कर्ष म्हणाला, मला म्हणे उत्कर्ष तरीपण तू खेळलास ना... मी म्हणालो, अगं मी खेळलोच नाही... its an accident. तुला पकडायचं असतं तर मग मी कसंही पकडलं असतं. माझेच मित्र मला सांगत होते खेळ पण तरीदेखील मी खेळलो नाही... जयने मला उदाहरण दिलं मस्त, बाहेरून कोणी आग लावायला आलं तर आपण बाहेर पहारा देऊ शकतो, वाचवू शकतो. घरातच कोणी गॅस लावला तर ? विश्वासघात म्हणतात त्याला... मला त्याने तेव्हाच सांगितलं होतं की, ही तुम्हांला सगळ्यांना threat होईल.” मीराचे म्हणणे आहे, विश्वासघात नाही तिला insecurity आहे... आणि चर्चा पुढे सुरू राहिली... पुढे या दोघांमध्ये अजून काय काय चर्चा झाली हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा.

तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Bigg Boss Marathi S3

Post Your Comments