“तंटा नाय तर घंटा नाय…” रितेश देशमुखची बातच न्यारी! ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो आऊट”

'बिग बॉस'म्हणजे मनोरंजनाचा बादशाह असलेला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम. 'कलर्स मराठी' आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. अशातच आता पुन्हा एकदा नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा सीझन वाजवायला सज्ज आहे. त्यामुळे अफलातून धमाल आणि कल्ला तर होणारच ना भाऊ.... 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊची 'लयभारी' स्टाईल पाहायला मिळाली. अन् आता नव्या प्रोमोमध्येही त्याचा कमाल स्वॅग पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस'च्या घरात आतापर्यंत ज्या पद्धतीने गेम प्लॅन, टास्क स्पर्धक खेळले. त्याप्रकारे या पर्वातील स्पर्धकांना खेळता येणार नाही. कारण स्पर्धकांचे प्लॅन तोडायला रितेश भाऊ सज्ज आहे. प्रोमोमध्ये रितेश म्हणतोय,"तंटा नाय तर घंटा नाय... ते प्लॅन बनवणार आणि मी तोडणार.. कारण आता मी आलोय कल्ला तर होणारच... तो पण माझ्या स्टाईलने". रितेश भाऊ देणार अनोख्या अंदाजात झटका! महाराष्ट्रात लवकरच 'बिग बॉस'चा आवाज घुमणार आहे. आगळावेगळा भन्नाट रिअॅलिटी शो म्हणून 'BIGG BOSS'कडे पाहिलं जातं. हा कार्यक्रम जेवढा मनोरंजक आहे तेवढाच आव्हानात्मक आहे. या पर्वातही एकापेक्षा एक अतरंगी स्पर्धक अशक्य, अफलातून गोष्टी करताना दिसून येतील. तसेच रितेश भाऊ आपल्या अनोख्या अंदाजात झटकाही देणार आहे. 'बिग बॉस' मराठीचा नवा सीझन प्रेक्षकांना लवकरच कलर्स मराठी आणि JioCinema वर पाहता येईल.

Post Your Comments

Recommended