मुंबई १ डिसेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून प्रचंड भावुक वातावरण आहे. जिथे वादविवाद, भांडण, कट – कारस्थान होत होती तिथे आज सगळ्यांचे डोळे पाणावले आहेत. कारण देखील तसेच आहे, स्पर्धकांना भेटायला येत आहेत त्यांच्या कुटुंबातील लाडके काही सदस्य. जे त्यांना प्रोत्साहन देत आहे, सल्ले देता आहेत, गोड शब्दात कानघडणी देखील करत आहेत. घरातील सगळे सदस्य गहिवरून गेले जेव्हा सोनालीची आई घरी येऊन गेली. आज देखील तसंच काहीसं बघायला मिळणार आहे जेव्हा घरामध्ये जाणार विशालची आई.
पण याबरोबर सदस्यांसोबत बिग बॉस काही वेगळाच गेम खेळत आहेत. घरातील सर्व सदस्य कालपासून एकएककरून फ्रीज होत आहेत आणि मग रिलीज. आज बाथरूममध्ये देखील सदस्यांची गंमत सुरू असताना बिग बॉस यांनी त्यांनाच फ्रीज केले. पहिले उत्कर्ष, मग मीरा आणि जय देखील झाला फ्रीज. विकास त्यांना जेव्हा मदत करायला गेला तेव्हा बिग बॉसने त्याला देखील फ्रीज केले. बघूया अजून कोण कोण होणार फ्रीज.
बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज आरतरी ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
Bigg Boss Marathi S3
Post Your Comments