मुंबई १ डिसेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विशाल आणि मीनलची आज चर्चा बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये ते कॅप्टन्सी टास्क आणि विकासबद्दल बोलताना दिसणार आहेत. घरातील सदस्यांची नाती दर दिवसाला बदलत आहेत. कोणजाणे उद्या गायत्री, मीरा आणि जयमधील अबोला देखील दूर होईल. या घरात एकमेकांची साथ ही लागतेच मग ते कार्य असो व टास्क असो.
विशाल मीनलला सांगताना दिसणार आहे, कॅप्टन्सी टास्कविषयी काय बोलत होती... की तू स्वत:साठी खेळ दुसर्यांसाठी नाही... आता बघ. मी विकासला हाच प्रश्न विचारला. May be त्याला तसं वाटला असेल, वाहिनीने तसं सांगितलं की कॅप्टन्सी मला द्या मला द्या म्हणू नका... मी त्याला बोलो काय बोल्या मला समजलं नाही, मला असं वाटलं की ती म्हणत होती कॅप्टन मला बनवा म्हणून तिकडे जाऊ नका म्हणून, ग्रुपमध्ये खेळताय तुम्ही एकमेकांसाठी खेळा, एकमेकांना बनवा... मी कधीतरी गेलो आहे का मला सांग? कधीचं नाही गेलो. हे त्यातून मला त्यात घेऊन चालला आहे... मग म्हंटल याला नको पुढचं विचारायला. हा मला एकाच दुसरं करून सांगणार…
बघा पुढे काय घडलं आजच्या भागामध्ये. बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
Bigg Boss Marathi S3
Post Your Comments