बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 54! “…तो यांना बघणार पण नाही” – जय

मुंबई २ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता विशाल,विकास, सोनाली आणि मीनलमध्ये सगळं काही ठीक सुरू आहे असे दिसतं आहे. पण,गायत्रीच्या वागण्याचा तिघांना म्हणजेच जय, उत्कर्ष आणि मीराल राग आला आहे असे त्यांच्या आजच्या वागण्यावरून कळते. काही दिवसांपासून गायत्री टीम B मध्ये जाऊन बसत असल्याने ती भेडचाल मध्ये खेळते, जिथे बहुमत असते तिथेच ती जाते असे अनेक आरोप जय तिच्यावर करताना दिसणार आहे. आज याचविषयी जय, उत्कर्ष आणि मीराची चर्चा होणार आहे.

जय बोलताना दिसणार आहे, गायत्री is trying to go close to विकास. मीरा हे त्याला कालच सांगणार होती असे तिचे म्हणणे आहे विकास आणि सोनालीच्या. जय पुढे म्हणाला, ते दोघे हिला कलटी देणार... हे दिसतं आहे की तो desperately प्रयत्न करते आहे जवळ जवळ जाण्याचा. कुठे तो गेला की तिकडे ती. मीरा म्हणाली, हेच आधी ती माझ्या मागे मागे करायची. जय पुढे म्हणाला, त्यांच्यामध्ये नक्कीच वाद होणार, कारण ती काय करते आहे त्याची पहिली priority बनण्याचा प्रयत्न करते आहे. मीरा म्हणाली, तिथे सगळ्यांमध्ये Insecurity चालू झाली आहे आता. जयच्या मते या सगळ्यांमध्ये स्मार्ट जर कोणी असेल तर तो विशाल आहे. आता विशाल त्यांचा वापर करणार. विशालला माहिती आहे त्यांच्यामध्ये जर कोणी खेळणार असेल तर ती मीनल आहे. ज्यावेळेस dependency टास्क येणार तो मीनलसोबत डील करणार, यांना बघणार पण नाही...

आता विरुध्द टीममध्ये बहुमत झाल्याने जय, उत्कर्ष आणि मीराला सहन होत नाहीये की गायत्रीच्या वागण्याचा त्रास होती आहे की राग येतो आहे कळेल हळूहळू. तेव्हा बघत राहा राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Bigg Boss Marathi S3

Post Your Comments