मुंबई २९ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता उरले आहेत टॉप ८ सदस्य. काल संतोष चौधरी म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके दादूस यांना घराबाहेर पडावे लागले. आता या नव्या आठवड्यात कोण घराचा नवा कॅप्टन बनणार ? कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये येणार ? आणि कोण सेफ होणार ? याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना लागून राहली आहे. आज घरामध्ये रंगणार आहे
“Knock Out” हे नॉमिनेशन कार्य ! बघूया कोण कोणाला नॉमिनेशनमध्ये टाकणार ? कोणता सदस्य कोणाच्या बाजूने खेळणार?
Knock Out” या नॉमिनेशन कार्यामध्ये सदस्य ज्या स्पर्धकाला नॉमिनेट करू इच्छितात त्या स्पर्धकाच्या नावाचे पुस्तक पटकावायचे आहे. कोण होणार नॉमिनेट हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मारठीवर.
Bigg Boss Marathi S3
Post Your Comments