बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 47 ! बिग बॉस मराठीच्या घरात भरणार मासळी बाजार…

मुंबई २३ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडले “नॉमिनेशन एक्स्प्रेस” हे कार्य. या आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले मीरा, सोनाली, विकास, मीनल आणि संतोष चौधरी (दादूस) हे सदस्य. बघूया आता या सदस्यांमध्ये कोणता सदस्य घराबाहेर जाणार आणि कोणते सदस्य सेफ ठरणार. आज घरामध्ये भन्नाट टास्क रंगणार आहे. कारण, बिग बॉस मराठीच्या घरात भरणार आहे मासळी बाजार. आता हा टास्क नक्की काय आहे ? कोण जिंकणार ? काय घडणार ? हे कळेलच आजच्या भागामध्ये.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असे जाहीर केले आहे आज बिग बॉसच्या घरात मासळी बाजार भरणार आहे. आणि सदस्य मासे विकताना दिसतं आहेत. जय, विकास… विकास म्हणाला, पापलेट आहे बांगडा आहे आणि सारंगी पण आहे. जय तर मास्यांचे भाव अश्याप्रकारे लावतो आहे की त्यावर विशाल म्हणाला, थांब बँकेत जाऊन कर्ज काढतो.

या धम्माल टास्कमध्ये अजून काय मस्ती केली सदस्यांनी बघूया आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Bigg Boss Marathi S3

Post Your Comments