मुंबई २३ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस आज सदस्यांना भन्नाट टास्क देणार आहेत. आणि याचसाठी घरामध्ये भरणार आहे मासळी बाजार. टास्कमध्ये राडा, प्लॅनिंग होणार नाही असं तर शक्यच नाही ना ! आज घरामध्ये सुरू आहे चोराचा मामला... म्हणजेच बिग बॉस मराठीच्या मासळी बाजारात होणार आहे चोरी. टास्क जिंकायला सदस्य साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करतात. आपल्या टीमकडे कसे पैसे जास्त गोळा करता येतील यासाठी घरातील सदस्यांमध्ये सुरू आहे चोरी करण्याचे प्लॅनिंग. आता दुसरी टीम हे कितपत होईल देईल हे बघूया आजच्या भागामध्ये. याचविषयी आज मीरा, जय, उत्कर्ष यांची चर्चा सुरू आहे की, पैसे लपवूया तर दुसरीकडे, विशाल आणि मीनल यांची चर्चा सुरू आहे कसे पैसे चोरता येतील यावर.
मीराचं म्हणणं आहे, मी काय म्हणते आहे अर्धे पैसे मी आता लपवून ठेवते आहे. जयचे यावर म्हणणं आहे का ? ते नाही घेऊ शकतं पैसे. मीराची शंका आहे, ते तुझ्याकडून चोरू शकतील असे तिने उत्कर्षला देखील सांगितले. उत्कर्षचे म्हणणे आहे, पैसे घेणार कोण ना कोण तरी आपले. उत्कर्षने पैसे शर्टच्या आतमध्ये लपवले.
विशालचे मीनलला म्हणणे आहे, आपण पैसे चोरू शकतो ना आताच एका दिवसाचे ... पण त्याने पैसे शर्टच्या आत ठेवले आहेत. यांचा चालू झाला रे राडा... बघूया मीनल आणि विशाल पैसे चोरण्यात यशस्वी होतील का ?
तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
Bigg Boss Marathi S3
Post Your Comments