बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 50! “मी कोणाच्या बापाला घाबरत नाही” – सोनाली !

मुंबई २६ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टन्सी टास्क पार पडला. जय आणि मीरा या दोन कॅप्टन्सीच्या उमेदवारांमध्ये हा टास्क रंगला. यामध्ये जय विजयी ठरल्याने घरचा कॅप्टन होण्याचा बहुमान या आठवड्यात त्याला मिळाला... टास्क दरम्यान विकास – विशालमध्ये खूप मोठा राडा झाला. आणि याचमुळे विशाल, मीनल, सोनाली विकासवर नाराज आहेत. विकास आणि सोनालीमध्ये देखील भांडण सुरू आहेच. विकासचे वागणे, त्याचे बोलणे सोनालीला काही दिवसांपासून पटत नाहीये. आज मीनल आणि सोनाली घरात घडणार्‍या, ग्रुप मध्ये घडणार्‍या गोष्टींवर चर्चा करताना दिसणार आहेत.

मीनलचे सोनालीला म्हणणे आहे, आपल्या इमोशनचा फायदा घेतात सगळे. सोनाली म्हणाले, बोला तो कालच्या याच्यामध्ये...सगळंच कालचं काढले त्याने. विशाल निकमला म्हणे, कोण आहे हा विशाल निकम ? मी इथे घरात आल्यानंतर  कळालयं. तो माझा चांगला मित्र झाला, तो जसा चांगला मित्र झाला... तो जसा चांगला मित्र झाला तसा तू झाला, तशी मीनल झाली चांगली मैत्रीण झाली... मग मी तुम्हांला घाबरते. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. काहीपण बडबडत होता, की ज्याचा काही ताळ ना तंत्र. सगळं पर्सनल बोलत होता...” ही चर्चा अशी पुढे चालू राहिली... अजून काय बोल्या आणि कोणाबद्दल बोल्या जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी.

बघूया दोघी नक्की कोणाबद्दल बोलत आहेत. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Bigg Boss Marathi S3

Post Your Comments