बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस नववा ! बिग बॉस “राम राज्य येणार… लवकरच” – विकास पाटील !

मुंबई ३० सप्टेंबर, २०२१ : “बिग बॉस घरात राम राज्य येईल” विकास पाटीलने आज केली बिग बॉस मराठीच्या घरामध्ये घोषणा. आज विकास घरामध्ये थेट बिग बॉस यांच्याशी संवाद साधणार आहे. विकास आणि विशाल अशीच कोणत्या तरी मुद्द्यावर चर्चा करत असताना अचानक विकास पाटील म्हणाला “आता जरी रावणाचं राज्य असलं तरी एक ना एक दिवस राम राज्य येईल बिग बॉस काळजी करू नका”. सत्याच्या बाजूने आम्ही उभे आहोत आणि ही लढाई आम्ही जिंकणार असं देखील विकास म्हणाला. तर मीनलचं देखील तसंचं म्हणण पडलं,“मला आंदोलन करायचं आहे. जी तानाशाही सुरु आहे त्याच्याविरोधात”. विकास पुढे म्हणाला, “बघना सकाळपासून फक्त आपणचं काम करतो आहे आणि ते काय करत आहेत गेम खेळत आहेत. अख्खा महाराष्ट्र बघतो आहे बिग बॉस... आता यावर चर्चा पुढे किती रंगली ? कोणाचं काय म्हणणं आहे कळेल आजच्या भागामध्ये.

तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Bigg Boss Marathi S3 - Day 9 Images

Post Your Comments