बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस सातवा !
मी मिरचीची धुरी मात्र नक्की देणार – गायत्री दातार
टास्क जिंकण्यासाठी कुछ भी !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आजपासून सुरू होणार आहे नवा टास्क
“हल्ला बोल” ! या टास्कमध्ये समोरच्या टीमला मोटर बाईकवरुन उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच टास्क संदर्भात टीम चर्चा करताना दिसणार आहे. उत्कर्ष- अक्षय, गायत्री -जय, स्नेहा - मीरा, तृप्ती देसाई - संतोष म्हणजेच दादुस. या ग्रुपमध्ये टास्क सुरू होणयाधी चांगलीच चर्चा रंगली. कसं आणि काय काय गोष्टींचा वापर करून सदस्यांना उठवता येईल. हल्ला बोल टास्क मध्ये कोणा कोणाचे वाद होणार ? कोणत्या गोष्टींचा वापर केला जाणार ? हे आजच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे.
ग्रुपमधील प्रत्येक सदस्याने त्याला पटतील अश्या युक्त्या काढल्या. गायत्रीचं म्हणणं पडलं मी मिरचीची धुरी देणारच. कोणी सांगितलं कचरा टाकुया, तर कोण म्हणाला अंडी फोडूया, कोणी म्हंटल साबणचं पाणी टाकुया. बघूया यांच्या या युक्त्या त्यांची किती साथ देतात? आजच्या भागामध्ये. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
Bigg Boss Marathi S3 - Day 7 Images
Post Your Comments