बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस दुसरा
“मला वाटलं तुम्ही इथे पण तश्याच वागणार” - मीरा जगन्नाथ
मुंबई २१ सप्टेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला आणि सदस्यांनी त्यांच्या नजरेत कोण टिकाऊ आणि कोण टाकाऊ आहे हे सांगितले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याची दर दिवशी वेगवेगळी रूप बघायला मिळतात. कधी कधी जुन्या भेटीगाठी देखील समोर येतात. मीरा आणि सुरेखा कुडची यांनी “नकळत सारे घडले” या मालिकेसाठी एकत्र काम केले होते आणि त्याचीच आठवण मीराला घरामध्ये त्यांना बघितल्यावर झाली. मीरा आज त्यांना हेच सांगताना दिसणार आहे. सुरेखा कुडची यांना मीरा म्हणाली, “तिकडे आपलं काहीतरी झालं होतं”, सुरेखा कुडची म्हणाल्या काय झालं होतं माझ्यासाठी रात गई बात गई... त्यावर मीरा पुढे म्हणाली, “जेव्हा मी तुम्हाला घरात पहिलं तेव्हा माझं असं झालं, बापरे या इथे पण अश्याच वागणार की काय ? मी गायत्रीला देखील बोलले, यांच्या वाईब्स खूप भारी वाटत आहेत. मी जो विचार केला होता ना तुम्हाला बघून तश्या तुम्ही नाहीच आहात, किंवा मग बाहेर वेगळं आणि इथे वेगळे वागत आहोत आपण असंही झालं माझं”. त्यावर सुरेखा यांनी विचारले तिथे काय झालं होतं त्यावर मीरा म्हणाली, “तुम्ही माझी बॅग फेकली होती”. हे ऐकून त्यांना देखील धक्का बसला. यापुढे काय झालं ? ते बघा आजच्या भागामध्ये अजून आजच्या भागामध्ये काय झालं ? कोणता टास्क दिला गेला? हे जाणून घेण्यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी सिझन ३ दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर
Post Your Comments