Home » संजूचं आगळंवेगळं रक्षाबंधन – सुजित संजूला बांधणार राखी !
संजूचं आगळंवेगळं रक्षाबंधन – सुजित संजूला बांधणार राखी !
- posted by
- CM Admin
- last updated on
- August 23, 2021
- at
- 1:09 pm
संजूचं आगळंवेगळं रक्षाबंधन – सुजित संजूला बांधणार राखी !
राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये आज बघा संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
रक्षाबंधन हा प्रत्येक भाऊ आणि बहिणीसाठी जिव्हाळ्याचा सण… प्रत्येक बहीण या सणाची वाट आतुरतेने बघत असते. भावा – बहिणीचं अतूट नातं या दिवशी मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं. राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये आपल्याला आगळंवेगळं रक्षाबंधन बघायला मिळणार आहे. नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या भागामध्ये अपर्णाचं सत्य संजुने संपूर्ण ढालेपाटील कुटुंबासमोर आणून तिची घरातून हकालपट्टी केली. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सुजितची अपर्णापासून सुटका केली. इतके दिवस सुजित अपर्णाला सहन करत होता. पण या सगळ्यामध्ये संजूची त्याला खंबीर साथ होती. आता मात्र संजूने अपर्णाला सुजीतच्या आयुष्यातून काढून टाकलं आहे. संजूने सुजितची रक्षा केली आहे. नेहेमीच भावाने बहिणीचे रक्षण करायचे असे नाहीये, बहीण देखील भावाची पाठराखीण बनु शकते तीदेखील भावाला संकटातून बाहेर काढू शकते हे नक्कीच ! आणि यामुळेच आजच्या मालिकेच्या भागामध्ये सुजित संजूला राखी बांधणार आहे. तेव्हा नक्की बघा राजा रानीची गं जोडी मालिकेचा आजचा रक्षाबंधन विशेष भाग संध्या ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
Promos










































































