
Home » सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये रंगणार मंगळागौर विशेष भाग !
सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये रंगणार मंगळागौर विशेष भाग !
- posted by
- CM Admin
- last updated on
- August 23, 2021
- at
- 12:52 pm
सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये रंगणार मंगळागौर विशेष भाग !
सोम ते रवि रात्री ९.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत रंगलेल्या मंगळागौरीच्या खेळाचे हे पडद्या मागील खास क्षण. पाहा #SundaraManamadhyeBharali सोम-रवि. रात्री 9 वा. #ColorsMarathi वर. pic.twitter.com/ffwTR9ckPT
— Colors Marathi (@ColorsMarathi) August 21, 2021
श्रावण महिना म्हंटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर उभे राहतात ते श्रावण महिन्यातील सण. श्रावण महिना आला की चाहूल लागते ती सणांची. श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवार, महादेवाची पूजा, पण त्यातही मंगळागौर म्हटलं की, महिलांचा विशेष उत्साह दिसून येतो, कारण मंगळागौर हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जाणार आहे. मंगळागौरीची चांगलीच जय्यत तयारी करण्यात आली आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लतिकाने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, साजेसे असे दागदागिने देखील परिधान केले आहेत. सगळ्याच महिलांनी पारंपारिक नऊवारी साडी नेसली आहे. यात अपवाद म्हणजे कामिनी कारण तिला शिक्षा देण्यात आली आहे. इतर महिलांसोबत लतिका देखील मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहे. कारणही तसंच आहे. आता हे काय कारण आहे ते लवकरच प्रेक्षकांना कळेल. तेव्हा नक्की बघा सुंदरा मनामध्ये भरली मालिकेचा मंगळागौर विशेष भाग सोम ते रवि रात्री ९.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
लतिकाची बँकेतील मैत्रीण रूपाली हिची ही मंगळागौर साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळेच मंगळागौरीची पारंपरिकरित्या पूजा करण्यात आली आहे. आणि सगळ्या बायका मिळून मोठया उत्साहात मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहेत. या पूजेसाठी रसिकाने धुमाळ आणि जहागीरदार कुटुंबाला आमंत्रण दिले आहे. मंगळागौरीची पूजा पार पडते आणि त्यानंतर खेळांना सुरुवात होते. पण, याच उत्साहाच्या वातावरणात आता कोणता नवा ट्विस्ट येणार ? काय घडणार ? हे नक्की बघा सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये सोम ते रवि रात्री ९.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
Promos
